Psalms 30

स्तोत्र; मंदिराच्या प्रतिस्थापनेच्या वेळचे गाणे. दाविदाचे स्तोत्र.

1हे परमेश्वरा, मी तुला उंच करील, कारण तू मला उठून उभे केले आणि माझ्या शत्रूंना माझ्यावर हर्ष नाही करू दिलास.
2हे परमेश्वरा, मी तुला मदतीस हाक मारली आणि तू मला बरे केले.
3हे परमेश्वरा तू माझ्या जीवाला मृतलोकांतून वर काढून आणलेस. मी खाचेत उतरू नये, म्हणून तू मला जिवंत राखले आहे.

4जे तुम्ही विश्वासयोग्य आहा, ते तुम्ही परमेश्वरास स्तुती गा. त्याची पवित्रता स्मरून त्याच्या नावाल धन्यवाद द्या.

5कारण त्याचा राग काही क्षणाचा आहे, परंतु त्याचा अनुग्रह आयुष्यभर आहे.
रडने कदाचीत रात्रभर असेल, परंतु सकाळी हर्ष होईलच.

6मी आत्मविश्वसात म्हणालो, मी कधीही ढळणार नाही.

7होय, परमेश्वरा तुझ्या अनुग्रहाने मला बळकट पर्वतासारखे स्थापले आहे. परंतु जेव्हा तू आपले मुख लपवतोस तेव्हा मी भयभीत होतो.
8परमेश्वरा, मी तुझ्याकडे आरोळी केली आणि माझ्या प्रभू कडून अनुग्रह मागितला.

9मी मरण पावल्यावर खाली थडग्यात गेलो तर काय लाभ?

माती तुझी स्तुती करणार काय? काय ती तुझी विश्वासयोग्यता सांगेल काय?
10हे परमेश्वरा, ऐक आणि माझ्यावर दया कर. हे परमेश्वरा, मला मदत करणारा हो.

11तू माझा शोक करणे, नाचण्यात पालटवला आहे. तू माझे गोणताट काढून मला हर्षाचे वस्र नेसवले आहेत.

म्हणून माझे हृदय तुझी स्तुती गाणार आणि शांत राहणार नाही. हे परमेश्वरा, माझ्या देवा मी तुझी सर्वकाल स्तुती करीन.
12

Copyright information for MarULB